11 May, 2010

"ठिकरी"

व. पु. म्हटलं की खरंतर मी जरा धाकधुकीनच पुस्तक हातात घेते; कारण त्याचं लिखाण (मी जेवढं वाचलंय तेवढं) मला extreme वाटतं. म्हणजे "एक घाव दोन तुकडे" प्रकारचं. पण "ठिकरी" सकाळी हातात घेतलं आणि तासाभरात बघता बघता संपलंदेखील! पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं बोलकं! नेहमीप्रमाणे आधी पुस्तकाच्या मागच्या बाजूला पुस्तकातला एखादा परिच्छेद असतो तो वाचायला घेतला. तेव्हा कळलं की ही ठिकरी म्हणजे मला माहित असलेल्या टिपऱ्यांच्या खेळातली "टिपरी" - जिला खेळवणारा कोणी वेगळाच असतो; ती आपली या चौकोनातून त्या चोकोनात पडत जाते! म्हटलं तसं, पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेववेना. खरंतर स्त्रीप्रधान म्हणता येईल अशीच एक साधीशी गोष्ट! पण व. पुं.ची लेखणी लागल्यामुळे खूपच वेगळी वाटते. कित्येकदा अशी स्त्रीप्रधान / स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत बोलणारी / त्यांच्या अत्याचाराला वाचा फोडणारी पुस्तक किंवा सिनेमे पाहून मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यात "सगळं कसं छान जुळून आलंय" म्हणतात त्याप्रमाणे एखादीच्या आयुष्यात "सगळंच कसं विपरीत घडत गेलं" असा कसं काय असू शकत - असा प्रश्न पडतो. अशा वेळेस गोष्टीपुरत का होईना "नशीब!" एव्हढं एकच उत्तर सापडतं! उदाहरणादाखल याच पुस्तकातलं एक वाक्य: "लग्नानंतर वेगवेगळे उपाय करूनही अनेकांच्या घरात पाळणे हलत नाहीत. पण असे हे अत्याचार झाले की हमखास अपत्याचं आगमन व्हायलाच हवं का? फसवणूक झाली म्हणजेही हाच अनुभव येतो."

असो!

शीर्षक: ठिकरी
लेखक: व. पु. काळे
प्रकाशन: मेनका
किंमत: ३०/- फक्त
पाने: ११०

2 comments:

koustubh kulkarni said...

sagalyat interesting goshta mhanje -- kimmat 30 rupaye fakta ?? chyala me gelya 5 varshat 30 rupayala ekahi pustak pahilele nahi ...aso, va pu nche mala fakta katha-kathan avadata ... ani "vapurza" !! me tyancha ek kathancha pustak vachalela ahe .. pan nav athavat nahi .. baki tyanche upadeshache dos khoop jasta asatat .. tyamule bore hota.

Girija said...

@कौस्तुभ,
हो, हे खरं आहे कि उपदेशाचे डोस असतात! असो! आपण मनाला नाही लावून घ्यायचं :D हेहे..
हो, त्याची शेवटची आवृत्ती बहुतेक १९९० किंवा अशीच निघाली आहे, मी आता विसरले, बघून सांगेन.. पण त्यामुळे ३० रुपये ठीक आहे! :)