20 January, 2008

sink point

"sink point".. अस एखाद ठिकाण जिकडे सगळ्या भावना ’sink’ होतात..
काहीन्साठी आई-बाबा ’sink point’ असतात.. काहीन्ना मित्र-मैत्रिणी.. पण प्रत्येकालाच अशा ’sink point’ ची गरज पडत असेल, नाही का?
कितीही एकट्याने जगण्याचा आव आणला तरी कोणत्या ना कोणत्या क्षणी माणसाला दुसर्याची गरज भासतेच.. म्हणजेच एका ’sink point’ ची..
मगाशी म्हटल्याप्रमाण काहीन्चे ’sink point’ त्यान्च्या ओळखीचे लोकच असतात.. उदाहरणार्थ.. आई-बाबा.. नातेवाईक.. मित्र-मैत्रिणी.. पण जर एखाद्याला यापैकी कोणीच तितक जवळच वाटत नसेल पण परकच कोणी तरी ’sink point’ वाटत असेल, तर त्या नात्याला काय नाव द्यायच?? म्हणजे.. अशी एखादी व्यक्ती जिने ’दिवस कसा गेला?’ एवढ जरी विचारल तरी छान वाटव.. जेव्हा मन ठिकाणावर नसत तेव्हा त्या व्यक्तिला समोर बसवुन सगळ सान्गुन टाकाव.. हो.. पण फक्त ’sink point’ म्हणजे.. उलट बाजुने त्या व्यक्तिने काही अपेक्षा नाही धरायच्या.. जस की ’एकतर्फी’ फक्त आपल्या चिन्ता त्या व्यक्तिला द्यायच्या.. तिने त्या दूर कराव्यात अशीही अपेक्षा नाही.. फक्त तिने त्या ऐकून घ्याव्यात.. समजून घ्याव्यात.. त्या दृष्टिने हक्काच माणुस..

काय नाव द्यायच या नात्याला??

हो पण प्रेम नक्कीच नाही.. कारण त्या व्यक्तीने अपेक्षा धरायच्या नाहीत.. प्रेम निस्वार्थी असत.. अपेक्षाविरहित असत म्हणतात.. पण असत का खरच? ’लग्न’ ही अपेक्षा तरी नक्कीच असते.. नाही का? म्हणुनच हे प्रेम नव्हे..

2 comments:

Unknown said...

This point is called SHARING POINT.
To share is what human needs when he feels alone.

Girija said...

well nahi..
not sharing.. sharing madhye roles exchange hoatat.. kadhi apan share karato, kadhi dusara..