12 August, 2009

स्वाइन फ्लू का? बर...

सध्या सगळीकड़े जोरदार चर्चा सुरु आहे ती स्वाइन फ्लू ची... मी अजुनही या बाबतीत लई थंड आहे... म्हणजे "बर... स्वाइन फ्लू का... बर मग मी काय करणं अपेक्षित आहे?" - असं.... "काळजी घ्या" असं लोकांचं हजार वेळा सांगून झालं... आजकाल लोकांचं वर वर का होईना ऐकायचं असं ठरवल्यामुळे "बर" म्हटलय खरं मी पण काळजी घ्या म्हणजे काय करा? हे काही मला माहीत नाही... असो...

पण या तथाकथित भीतिमुळे माझ्या डोक्यात लगेच कीडे वळवळायला लागले... समजुन चालु की उद्या मलासुद्धा स्वाइन फ्लू की काय तो (किंवा कोणताही तत्सम, जीवघेणा वगैरे आजार) झाला... तर मी काय करेन? आशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला "टाटा, बाय बाय" म्हण्याआधी करायच्या आहेत? कसंय ना... मरण काही अवधी देत नाही असा विचार करायला... की बाबा रे... घे तुला मी १० दिवस देतो... कर तुला काय हवय ते... आणि मग चल माझ्यासोबत... :D म्हणुन म्हटलं... या निमित्ताने तरी का होईना... एकदा विचार तरी करून बघू...

तर हे सगळं मी माझ्या एका मित्राला सांगत होते... त्याने मला वेड्यात काढलं! म्हणे..."sometimes you are too much!" मग मी विचार केला, खरच का मी वेड्यासारखा विचार करतेय? मरण - जी अटळ गोष्ट आहे... जन्म आणि मरण या दोनच निश्चित घटना माणसाच्या आयुष्यात असताना, असं कसं कोणीच कधी त्याबद्दल बोलू देत नाही? माझा मते मरण काही तितकसं भयानक वगैरे नसावं... त्यानंतर इतरांचं आयुष्य मात्र भयानक होवू शकतं, पण ते सुद्धा काही काळासाठीच... म्हणजे बर्याचदा आपण एखाद्या गोष्टीच्या परिणामांनाच जास्त घाबरून असतो... त्या गोष्टिपेक्षा... असो...

तर मुद्दा असा की मग मी विचार करायला लागले... काय काय बरं करावं? तर केवढं काय काय सुचलं... सगळ्यात पहिलं सुचलं ते म्हणजे माझं MTP! :P जसं काही मी नाही तर त्याला वालीच नाही... हे..हे... मग बरंच काही काही सुचत राहिलं... काही मुद्दामहून विसरलेली माणसं आठवली... ज्यांना एकदा तरी पुन्हा भेटावं असं वाटलं... मग वाटलं... अरे, काल त्या मित्राशी उगीच भांडले... त्याच्याशीसुद्धा एकदा बोलून घेवु... असं लई काय काय सुचायला लागलं...
थोडक्यात काय तर आधी किम्मत न केलेल्या गोष्टी आता फारच अमूल्य वाटू लागल्या... पण कसंय ना... माणसाचा इगो त्याच्या सोबतच जातो कदाचित... त्यामुळे या सगळ्या गोष्टींपैकी अगदी थोड्याच मी तात्पुरत्या शोर्ट-लिस्ट केल्या आणि सरळ कामाला लागले... एक मात्र खरं, की त्यामुळे मला कामाचं अजुन एक मोटिव्हेशन मिळालं... हे ही नसे थोडके...

1 comment:

योगी / Yogi Devendra said...

Live every day as if it were your last...

--
Jeremy Schwartz