पोस्टच नाव वाचून तुम्ही काय विचार केला असेल, खरंच माहीत नाही. पण हे पोस्ट आहे, माझ्या एका अत्यंत आवडत्या लेखकाबद्दल आणि आवडत्या २ पुस्तकांबद्दल...
खरं तर मी "पुस्तक वेडी" / "वाचन प्रेमी" वगैरे कधीच नव्हते... शाळेत क्रमिक मराठी पुस्तकांशिवाय मी फ़क्त दररोज येणारा "सकाळ", त्यासोबत येणार्या पुरवण्या आणि दिवाळीत येणारी "पाडवा विशेष" पुरवणी किंवा फार फार तर "साप्ताहिक सकाळ" या पलिकडे काही वाचलं नाही... नाही म्हणायला, पु. लं. चं थोडं फार दहावीच्या सुट्टीत वगैरे वाचलं असेल, इतकच... मराठीची ही तर्हा, तर हिंदी आणि इंग्रजी बद्दल तर बोलायलाच नको... हिंदी वाचनाचा मला खूप कंटाळा यायचा... अजूनही येतो... माझं खरं "वाचन" सुरु झालं ते वयाच्या एकविसाव्या वर्षी... तेव्हा मी बंगळूरात कामानिमित्त, घरापासून दूर अशी होते... घरी, पुण्यात कधीच केल्या नाहित अशा गोष्टी मी तिकडे पहिल्यांदा केल्या... जसं की "स्वयंपाक" :D तसंच एक "वाचन"... सुरुवात झाली ती इंग्रजी पुस्तकांपासून... मग हळुहळु कल मराठी पुस्तकांकड़े वळला...
पूर्वी कधी तरी "झी मराठी" वर एक मालिका लागायची... "गहिरे पाणी" - मी ही मालिका अतिशय आवडीने पहायचे... जेव्हा मराठी वाचन सुरु केलं तेव्हा पहिलं पुस्तक वाचावंस वाटलं, ते "रत्नाकर मतकरीं" चं... काही पुस्तकं वाचल्यावर लक्षात आलं की मतकरी सगळच काही रहस्यमय लिहित नाहित... उदाहरणच द्यायचं झालं... तर त्यांचच "माणसांच्या गोष्टी" हे पुस्तक... एका वाक्यात सांगायचं तर - माणूस एकच पण त्याचा दोन प्रसंगापरत्वे बदलणारा स्वभाव - तो बदल किती अतर्क्य असतो कधी कधी, याच्या गोष्टी... हे पुस्तक मला खूप आवडलं.. आणि ते ही रहस्यप्रधान नसून देखिल! परवाच घरी मतकरींचचं अजुन एक छानसं पुस्तक वाचायला मिळालं... "शांततेचा आवाज" - खरं सांगायचं तर हे पुस्तक मी नावावरून "रहस्यमय" असेल असं वाटल्यामुळे घेतलं पण नंतर कळलं की या सुद्धा साध्याच गोष्टी आहेत... काही लेखकांच्या लिहिण्याच्या पद्धतीमुळेच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. मतकरींच्या बाबतीतही हेच आहे. रहस्यमय असो किंवा नाही, त्यांचं पुस्तक हातात घेतलं की ठेवावसच वाटत नाही!
व. पु. - नाही! त्यांचं लिखाण मला कधीच आकर्षक वाटलं नाही. सर्वात पहिलं वाचलं ते "पार्टनर" - खरच खूप बोअर झालं! अशातच एक दिवस - शनिवारी लायब्ररीमधुन "दुनियादारी" आणलं. रविवार कसा गेला, समजलच नाही! एका बैठकीत संपवलेलं हे एकमेव पुस्तक असावं! त्यातलं काय आवडलं हे सांगणं खरच कठीण आहे कारण जेव्हा दुनियादारी पुस्तकावर बेतलेली मालिका झी मराठीवर लागायची तेव्हा मला ती अशक्य बोअर झाली! असो! :)
आय.आय.टी मध्ये असताना रुपालीकडुन "दुर्दम्य" बद्दल ऐकलं होतं. खूप दिवसांपासुन इच्छा होती की वाचावं. टिळक म्हणजे माझे आदर्श - दैवत म्हटलं तरी योग्य! गंगाधर गाडगीळ लिखित या चरित्राने अतिशय सुन्दर अनुभव दिला. यामधल्या एका उतार्याबद्दल मी इथे आधी लिहिलं आहेच. या पुस्तकाच्या वाचनाबद्दलच्या २ मस्त आठवणी आहेत. एक म्हणजे मला एरवी बस मध्ये पुस्तक वाचताना प्रचंड झोप येते पण या पुस्तकाचं अर्ध्याहून अधिक वाचन माझं बस मध्येच झालंय! पुणे-मुम्बई एशिआड मध्ये! :) आणि उरलेलं KReSIT च्या SIC 312 मध्ये! त्याची मजा म्हणजे - हे पुस्तक मे लॅबमध्येच नेऊन ठेवलं होतं. प्रोजेक्ट करून बोअर झालं की वीस एक पानं वाचुन काढायचे मी. मागल्या वर्षी डिसेंबर-जानेवारी च्या सुमारास vldb deadline च्या वेळेस असंच एकदा वाचत होते आणि माझ्या गाईड vldb संबंधी काही बोलायला लॅबमध्ये आल्या. त्यांनी पुस्तक पाहुन त्याबद्दल विचारलं. मी लगेच टिळकांबद्दल भरभरुन बोलायचा आणि पुस्तकाची जाहिरात करायचा चांस मारला! :D vldb सोडुन आम्ही "दुर्दम्य" वरच बोलत बसलो! इतका की त्यांनी (त्या बेंगाली आहेत, पण टिळक बेंगाल मध्येही कमालीचे लोकप्रिय होते!) मला "मी ते नंतर वाचायला घेइन" असं सांगितलं! मगच मी माझी बडबड थांबवली! ;) पण मराठीत असल्यामुळे त्यांनी ते वाचलं नाही ती गोष्ट वेगळी!!
2 टिप्पणी(ण्या):
Warshacha PahiLa Lekh Wachun aananda zala ! :) MatKari.. Duniyadari aani Durdamya teenahi mee WaachaLele nahit .. tyamule Tyanchya Baddal Me Nahi kahi farse Bolu Shakat.. Baki Tuza Persuasive Ness DurdamyaCh aahe !!
छान ..
गहिरे पाणी मला आणि माझ्या बहिणीला खूप आवडायचं .. त्या आधी मी लहानपणी "संदेह:" हे पुस्तक वाचलं होतं. ते मला तेव्हा adult वाटलं होतं :D.
दुर्दम्य वाचून बघीन ...
Post a Comment