गेल्या आठवड्यात सुहास शिरवळकरांच "कट्टर" वाचलं. हिंदू-मुस्लीम संघर्ष, धर्मांतर, हिंदुंवर होणारे जुलूम, त्यातही तग धरणारा एक हिंदू आणि शेवटी त्याच्या संघर्षाची आणि बलिदानाची गोष्ट म्हणजे कट्टर. पुस्तक वाचताना अशी छान चित्र डोळ्यासमोर उभी राहत होती. एक सुंदर असा अर्थपूर्ण सिनेमा त्यावर निघेल असं वाटला. असो. तर त्यात जेव्हा गोष्टीतला नायक "भरत" मरतो तेव्हा त्याच्या मागावर असणारे मुस्लीम त्याच्या पार्थिवावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचा ठरवतात. खरतर, धर्मांतर करायला भाग पडणारे हे मुस्लीम लोक असतात आणि भरत त्याच्याच विरोधात जाऊन आपला प्राण गमावतो, तरीदेखील तो मुसलमानांचा सेनापती म्हणतो - "हिंदूच राहिला शेवटपर्यंत, हिंदुंप्रमाणेच शेवटचे विधी झाले पाहिजेत"
आज ही बातमी वाचली. एव्हढ्या भीषण अपघातानंतर खरच या गोष्टींना काही अर्थ उरतो का? का ही २ कुटुंब वेगवेगळ्या धर्माची असावीत म्हणून हे असं सगळं? परवाच स्टीव्ह जोब चं स्पीच पाहिलं, त्यात तो म्हणतो - "Death is the final destination we all share". मग खरच या सगळ्या गोष्टींना एव्हढा महत्व आहे?
1 टिप्पणी(ण्या):
yach vishayavar (Hindu-muslim) Kanadi lekhak S.L.Bhairappa yanchi "Aavaran" navachi sundar kadambari ahe. Me punyat chalaloch ahe tar "Kattar" chalun baghin. avadala tar vachin.
Post a Comment