काल नेहमीप्रमाणे www.esakal.com चा tab उघडला. तर त्यावर "breaking news" दिसली - "मुंबईहून निघालेली 'शिवनेरी' बस जळाली. मुलुंड-ऐरोली पुलावरील घटना. सर्व प्रवासी सुखरूप" पण ती flash होणारी newsline सोडून अख्ख्या इ-सकाळ वर कुठेही काही बातमी नाही. आज सकाळी म. टा. मध्ये वाचली ती देखील अत्यंत थोडक्यात आलेली. म्हणजे आगीचं कारण वगैरे बद्दल काहीच नाही. आणि कहर म्हणजे काल एव्हढी breaking म्हणून flash केलेल्या बातमीला आज इ-सकाळ वर minimum coverage देखील नाहीये! coverage! साधा उल्लेख नाहीये!
मग संशय का येऊ नये?! कशावरून कोणतीतरी वेगळी कारणं लपवण्याचा प्रयत्न नाहीये? किमान आग का लागली याचा convincing explaination कळावं एव्हढीच अपेक्षा आहे!
2 टिप्पणी(ण्या):
आग शार्ट सर्किटमुळे लागली असे मुंबई सकाळमध्ये आहे.
@शरयू, धन्यवाद!
Post a Comment