17 April, 2010

मोनिषा-दुष्यंत, हंसा-प्रफुल आणि one and only - my cute geek!

अर्थात आम्ही आणि आमचे नाटकी हीरो (त्यातल्या २ हिरवीणी आहेत ती गोष्ट वेगळी)!

तसं तर मी काही टी. व्ही. ला नाक लावून बसणाऱ्यातली नाही. म्हणजे शाळेत असताना दिवसभर शाळा (मग आता शाळेत असताना अजून काय असणार?), अभ्यास इत्यादी इत्यादी आणि फक्त रात्री ७ च्या "टेSS ण णा, टे णा, ण णा" (म्हणजे आपल्या बातम्या हो!) आणि मग रात्री जेवताना "हम लोग", "बुनियाद", "सर्कस" अशा त्या काळात न कळणाऱ्या सिरिअल्स किंवा अगदी नंतरनंतरच्या "तेहेकीकात", "ब्योमकेश बक्षी", "सुरभी" (अशा कळणाऱ्या सिरिअल्स), अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे "मेरी आवाज सुनो!" - एव्हढाच (?) काय तो माझा टी. व्ही.शी संबंध! नाही म्हणायला नंतर नंतर आजीकडे (सगळे बघायचे म्हणून बरं! :D) दुपारचं "शांती" (हे बाकी आवडायचं मला), "इतिहास" (अरे हो! हे ही आवडायचं की! :P) मग कधी कधी ते "स्वाभिमान" (हि एक अत्यंत विनोदी सीरिअल होती - म्हणजे मला तरी फार हसू यायचं!), आणि फार फार तर रविवारी "चंद्रकांता" (प्रचंड हसवलेलं तिने मला), शुक्रवारी / शनिवारी रात्रीचे दूरदर्शन वरचे पिक्चर एव्हढंच! हो, त्या काळी टी. व्ही. आणि केबल या २ वेगळ्या गोष्टी मानल्या जायच्या! तर हे झालं टी. व्ही. चं! तर केबल वर देखील असंच जरा आपलं "सा रे ग म" (सोनू निगम वालं), "सी. आय. डी.", "खाना खजाना" किंवा मराठीमध्ये "प्रपंच", "झोका", "थरार", "४०५, आनंदवन" अशा काही मस्त सिरिअल्स - एव्हढंच मला माहिती! म्हटलं ना? मी काही टी. व्ही. ला नाक लावून बसणाऱ्यातली नाही! :D


पुढे केव्हा तरी अचानक त्या केबल चे चेनल्स अमर्यादित झाले आणि मग सिरिअल्स ची संख्यादेखील. म्हणजे "स्टार" किंवा "झी" नेच "प्लस", "न्यूज", "स्पोर्ट्स", "मुवीज", "माझा", "मराठी", "गोल्ड", "वर्ल्ड", "वन" अशी पालुपदं लावून घेतली आणि त्यासोबत विविध प्रकारच्या सिरिअल्स ची उधळण सुरु केली! त्यात मला रेसिपी आणि गाणी या दोहोंशिवाय बाकीच्या विषयावरच्या सिरिअल्स काही आवडायच्या नाहीत! नाही म्हणायला विनोदी मात्र बघायचे. आणि तेव्हाच केव्हातरी साराभाईने वेड लावलं. पण त्याचं खर वेड लागलं ते आय. आय. टी. मध्ये आल्यावर! इकडे आल्यापासून साराभाईची जी काही पारायणं केलीएत की विचारायची सोय नाही! त्यातली माझी अत्यंत लाडकी मोनिषा! आणि मग त्यानंतर दुष्यंत! मोनिषाचा सगळ्यात आवडणारा गुण (?) म्हणजे पैसे वाचवण्याच्या भन्नाट तऱ्हा! मग ते बार्गेनिंग असो किंवा सेलच्या मागे पळणं असो! नाही म्हणायला तिचा तो गुण माझ्यातही आलाय थोडासा! म्हणजे एकदा काय झालं.. मी टेबल क्लोथ आणायला डी.मार्टात गेलेले. तिकडे हे महागडे टेबल क्लोथ! त्यात सगळे पांढरे स्वच्छ! म्हटलं - सांगितलाय कोणी हा उद्योग!? आधीच महागाचे आणा आणि वर ते (इथे होस्टेल वर) वारंवार धुवायला लागणार! म्हणून मग मी एक उशीचं छानसं कव्हर आणलं.. मस्तपैकी त्याच्या २ बाजूंची शिवण उसवली आणि छानपैकी टेबलावर अंथरलं! उगीच नाही अशा आयडीया सुचत! सगळा मोनिषा चा परिणाम! असो! दुसरा नमुना म्हणजे दुष्यंत! त्याची कीर्ती काय वर्णावी! त्याच्या बुद्धीमत्तेच आणि कॉमन सेन्स चं कौतुक करावं तेव्हढ थोडंच आहे! म्हणजे गाडीला एक्सिडेंट झाला की हा बरोब्बर - गाडी कशी आहे - हेच विचारणार. माणसांपेक्षा मशीनवर च अती-प्रेम. वर निर्लज्जपणा तर इतका की..! आता हाच सीन बघा..!


असो! :D

तर ही झाली एक घनचक्कर फेमिली! दुसरी तेव्हढीच किंबहुना थोडी अधिकच घनचक्कर म्हणजे मोहन निवास (की जगदंबा निवास? :D) मध्ये राहणारी पारेख फेमिली! हंसा पारेख म्हणजे एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व! "haalo! how are? खाना खाके जाना हां!" असं म्हणून आल्या-गेल्याची (खरतर, घरी आलेल्यांचीच नव्हे तर कोणीही कुठेही अगदी रस्त्यात जरी भेटलं तरी!) "मेहेमाननवाजी" करणं हे एक हंसाच करू जाणे! इंग्लिश शब्द! मग तो कुठलाही (कितीही अवघड असो) प्रफुल पारेख त्यात एक्सपर्ट! जसं की "surgery" = सर पे जरी वाली साडी ली तो हो गयी surgery! "खिचडी" च्या एका एपिसोडमध्ये असं एक वाक्य आहे - "प्रफुल जैसा सोचना आसान नही है! बेवकूफ कि तरह सोचने के लिये बहोत अकल लगानी पडती है!" - हे मला पूर्णपणे पटलेलं आहे! हंसा चा वीक पोइंट म्हणजे गजरा, साड्या, दागिने आणि प्रफुल चा वीक पोइंट म्हणजे हंसा! दोघं प्रचंड धमाल उडवून देतात! :) त्यातले काही टिपिकल डायलोग्स तर मी देखील चुकून वापरायचे कधीकधी.. जसं की "नही (बाबूजी), ऐसा जरुरी नही है!" किंवा "प्रफुल! व्हाट इज!" (अर्थात, प्रफुल हा शब्द सोडून!) किंवा "बस हां बस! बस हो गया तेरा!" किंवा "बडे लोग! बडे लोग!" किंवा मग "अरे ऐसा खाना बनायेंगे की लगे हि नाही की खाना है.. :D" किंवा "हां हां बिनधास्त घर जा! किस्सीको पता नही चलेगा! :D" आता आय. आय. टी. मध्ये नुकतंच "खिचडी"चं पारायण केलं तेव्हापासून हे डायलोग्स पुन्हा एकदा जिभेवर घोळू लागलेत! :)

and here comes my HERO! :D the one and only Sheldon Cooper!!! (clap clap!! :D) I simply love this cute geek! :D ही सीरिअल बघताना मला नेहमी वाटतं की जर शेल्डन खरोखर अस्तित्वात असता तर मी लगेच त्याला मागणी घातली असती! नो मजा! खरच! :D हाच तो cute geek! एक नंबरचा आगाऊ, प्रचंड माज, पण अशक्य बुद्धिमान! त्याच्या देहबोलीमधुनच निम्म्याहून अधिक गोष्टी कळून जातात - म्हणजे आता हा "बझिंगा" म्हणणार किंवा आता हा नौटंकी सुरु करणार - किंवा आता पेनीला छळणार! :D
त्याची वेडी-वाकडी तोंडं, भयानक हास्य (?), त्याला शोभणारी ताडासारखी उंची, त्याचा चपळपणा - सगळंच simply awesome! :)
हा माझा सर्वात आवडता एपिसोड आहे बहुतेक!





Noticed that? - "please don't say, a white one!" माज कसा रोमारोमात भरलाय! :D फ्रेंडशिप करण्याचा algorithm लिहिणारा शेल्डन माझ्या सगळ्यात जास्त जवळचा आहे! कारण मीसुद्धा बऱ्याचदा तसं करते! :) खरच शेल्डन प्रत्यक्षात हवा होता! :)

असो!

या आणि अशा अजून काही नाटकी हिरोंनी आजवर मला खूप हसवलंय! मी TBBT , साराभाई, खिचडी आणि असल्या बाकीच्या सगळ्या चक्रम सिरिअल्स अशाच बघत राहो! :D

4 टिप्पणी(ण्या):

आनंद पत्रे said...

माथाटीप वाचुनही मी ब्लॉग वाचण्याची जोखीम (मराठीत रिस्क) घेतली.. ;-) पण तुम्ही मस्त लिहिता... साराभाई माझीही आवडती सिरीयल आहे.. बाकी खिचडी कधी बघीतली नाही खाल्ली आहे बरेचदा.... मस्त लेख..मजा आली वाचताना...

Megha said...

धन्यवाद आनंद! :)

davbindu said...

मी टीवी खुपच कमी पाहातो पण पाहिल तर अस हलक-फ़ुलक च पाहायला आवडत मल..म्ह् णुनच खीचडी आणि साराभाई दोन्ही आवड्त्या मालिका आहेत माझ्या...सब वरील ’ तारक मेहता..’ पाहाता का त्यात हंसा,मोनिषा सारख्या दयाभाभी आहेत....

Megha said...

तारक मेहता बद्दल ऐकलं आहे, पहिली नाहीये अजून.