06 January, 2010

वाटायचं मला..

मनीच्या गोष्टी समजाव्यात अशी मैत्री..
वाटायचं मला की, मनीच्या गोष्टी समजाव्यात..
न सांगता, अशी आहे आपली मैत्री...

डोळ्यातले भाव टिपून, मनातली अबोल घुसमट तुला समजावी..
तू धावत यावंस.. आणि अश्रुंना परतावून लावावंस..
न सांगता, अशी आहे आपली मैत्री..
वाटायचं मला..

भिरभिरणारी नजर.. थरथरणारे हात..
तू यावंस आणि त्यांना बळ द्यावंस ..
न सांगता, अशी आहे आपली मैत्री..
वाटायचं मला..

खुललेला चेहरा.. गुणगुणणारं मन..
काहीच वेगळं न घडूनही, जाणवणारं वेगळेपण..
तू ते बरोब्बर हेरावंस..
न सांगता, अशी आहे आपली मैत्री..
वाटायचं मला..

अशा वेड्यागत वागण्यात मजा खरी..
फक्त न सांगता.. एकदातरी..
तू म्हणावंस, वेडी कुठली!
अशी आहे आपली मैत्री..
वाटायचं मला..

-----------------------------------
(एका खऱ्याखुऱ्या मैत्रीबद्दल..)

0 टिप्पणी(ण्या):