सध्या करत असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे "दुर्दम्य" च वाचन. पुस्तक हातात घेण्यापूर्वी टिळक म्हटलं कि का कुणास ठावूक पण मला गणित आठवायचं. पुस्तक मात्र अगदीच वेगळी ओळख करून देतं टिळकांची. ती म्हणजे एका मुत्सद्दी राजकारण्याची. या पुस्तकाच्या दोन विशेष आवडलेल्या गोष्टी अशा की साधारणपणे चरित्र म्हणण्याजोग पुस्तक त्या व्यक्तीबद्दल खूपच चांगलं बोलणारं असतं पण या पुस्तकातून टिळकांच्या negative shades देखील दिसून येतात. आणि दुसरी गोष्ट अशी की, केवळ त्या व्यक्तीबद्दल साहित्य वाचून, त्यावरून संवाद कल्पून एखाद्या गोष्टीप्रमाणं एखाद्याचं चरित्र लिहिणं हि एक आव्हानात्मक गोष्ट आहे हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं. या पुस्तकातून त्या काळाच्या पुण्याची एक सुरेख सफर घडून येते आणि असा इतिहास असलेल्या पुण्याची आहे मी याचा अजूनच अभिमान वाटायला लागतो.
"दुर्दम्य" मधील मला आवडलेल्या बऱ्याच भागांपैकी एक:
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment